पुण्यातील मुलींचा निर्धार — शिक्षणासाठी पाऊल… व्यसनांविरुद्ध लढा!”

📍पुणे कॅम्प परिसरात आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. सेंट अँन्ड्रय़ूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी “व्यसनमुक्त समाजासाठी” रस्त्यावर उतरून जनजागृती फेरी काढली.
हातात फलक… मुखात नारे… आणि मनात संकल्प —
“शिक्षणाची कास धरूया, व्यसनांना दूर सारूया!”
असा संदेश देत विद्यार्थिनींनी संपूर्ण परिसरात जनजागृती केली.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे, शिक्षिका मारिया देठे, शिमला कांबळे, शिल्पा यादव, अपर्णा शिंदे आणि मीनल पवार यांची उपस्थिती लाभली होती.
🎤 मुख्याध्यापिका अर्चना साठे म्हणाल्या —
“व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, कुटुंबं उध्वस्त होतात. त्यामुळे शिक्षणाची कास धरून व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग निवडणे ही काळाची गरज आहे.”
📢 अमली पदार्थांचं सेवन केवळ शरीर आणि मनाचं नुकसान करत नाही, तर गुन्हेगारीकडेही नेऊ शकतं — हा गंभीर संदेश विद्यार्थिनींच्या फेरीतून स्पष्टपणे उमटला.
“शिक्षणाकडे वाटचाल… व्यसनांना रामराम!”
असा सकारात्मक संदेश देत सेंट अँन्ड्रय़ूज शाळेच्या विद्यार्थिनींनी आज एक सामाजिक जबाबदारी निभावली —
आणि दाखवून दिलं की, परिवर्तनाची पहिली पायरी विद्यार्थ्यांच्या पावलांतून सुरू होते.
