“मालधक्का चौकातील आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन; सरकारकडून सकारात्मक आश्वासन”

मुंबई | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक (मंगळवार पेठ) विस्तारीकरणासाठी जागा मिळावी यासाठी संयुक्त कृती समिती च्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.



या आंदोलनात हजारोच्या संख्येने सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिक —बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अनेक राजकीय पक्षांचे नेते ही या आंदोलनात सहभागी झाले.
सरकारच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनीलभाऊ कांबळे आणि राज्याच्या मंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. तसेच,महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी संयुक्त कृती समितीचे निवेदन स्वीकारले आणि यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी समितीचे अनेक सदस्य आणि संयोजकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे मागणीस नवसंजीवनी मिळाल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.