पतसंस्था जिल्हा प्रकोष्ठ सहप्रमुखपदी विनोद अष्टुळ यांची निवड

पतसंस्था जिल्हा प्रकोष्ठ सहप्रमुखपदी विनोद अष्टुळ यांची निवड
सहकार भारती संस्था हि गेली ४७ वर्षे सहकार क्षेत्रात संस्कारक्षम नेतृत्व घडविण्याचे कार्य करत आहे. संस्थेने नुकतेच सरकार भारती पुणे विभागीय निवासी अभ्यासवर्ग श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित केले होते. दोन दिवशीय पुणे विभागीय अभ्यास वर्गामध्ये सहकार भारती पुणे विभाग प्रमुख माननीय गिरीश भवाळकर यांनी पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. सहकार क्षेत्रातीलतील विविध विभागापैकी सहकारी पतसंस्था प्रकोष्ठ जिल्हा सहप्रमुखपदी मा. विनोद अष्टुळ यांची निवड करण्यात आली. अष्टुळ हे हडपसर पुणे येथील भागीरथी पतसंस्थेचे संस्थापक संचालक असून त्यांनी संस्था स्थापनेपासून सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष, कार्यलक्षी संचालक, संचालक अशी विविध पदे प्रामाणिकपणे पंचवीस वर्षे भूषवली आहेत. त्यांनी सहकारातील विविध विषयांवरील प्रशिक्षण घेतलेले आहे. ते शार्प एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव म्हणून पगारदार पतसंस्थेत कार्यरत होते. तसेच ते साहित्यिक,कामगार आणि आध्यात्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत असतात. ते महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत.
संस्कारात चांगली माणसे जोडली गेली पाहिजेत आणि संस्कारक्षम संस्था निर्माण होण्यासाठी अभ्यास अशा अभ्यासवर्गाची आवश्यकता आहे. असे उद्घाटन प्रसंगी सहकार भारतीचे कौतुक करताना प्रमुख पाहुणे राज्य सहकारी बँक असोसिएशन अध्यक्ष माननीय भाऊसाहेब कड यांनी व्यक्त केले. विविध सत्रांमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थितांना प्रशिक्षित केले. सहकार काल आज आणि उद्या या सत्रात प्रदेश महामंत्री विवेकजी जुगादे यांनी सहकाराविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांमध्ये सहकार भारतीचे केंद्रीय केंद्रीय पदाधिकारी मा.विनयजी खटावकर, रा.स्वं.संघाचे प्रांत बौद्धिक मंडळ सदस्य मा.मकरंद ढवळे, प्रदेश महामंत्री मा. विवेकजी जुगादे, साखर कारखाना महाराष्ट्र प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख मा.साहेबराव खामकर तसेच पुणे विभागातील सरकार भारतीचे नवनिर्वाचित मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे महानगरचे अध्यक्ष दिनेश गांधी यांनी तर कार्यक्रमाचे आभार पिंपरी चिंचवड महानगरचे अध्यक्ष माननीय दशरथ जाधव यांनी व्यक्त केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
