खडकीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न साठे जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान!

📰 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खडकीत प्रबोधनात्मक व्याख्यान

पुणे (प्रतिनिधी) –
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व मातंग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सभागृह, खडकी पुणे येथे सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत पार पडला. या कार्यक्रमात “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऊर्फ तुकाराम साठे यांच्या साहित्य प्रवास – एक गाथा!” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सचिन पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला, तर दुसरे वक्ते प्रा. मोहन शिंदे (हिंदी विभाग, एसपीपीयू) यांनी त्यांच्या विचारविश्वाचे सखोल विश्लेषण केले.
कार्यक्रमाला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी लोहिया, बोर्डाचे उपाध्यक्ष व प्रथम नागरिक अभयदादा सावंत, माजी नगरसेवक कमलेश चासकर, अतिक्रमण विभाग प्रमुख शिरीष पत्की, सौ. सुजा जेम्स, मातंग विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे हे प्रमुख उपस्थित होते.
सुत्रसंचालन मा. कलावंत पवार यांनी तरतरीतपणे पार पाडले. कार्यक्रमास बोर्डाचे पदाधिकारी व विविध पक्षांचे मान्यवर, यामध्ये भाजपचे शाम कांची, अजित पवार, राहुल कांबळे आणि शिवसेनेचे हेमंत यादव, प्रशांत राणे यांची उपस्थिती विशेषत्वाने उल्लेखनीय होती.
या कार्यक्रमास माऊली बोजवारे, मारुती शेलार, राजु सदामते, मनोज तिगोटे, आकाश परमवार, मधुकर कांबळे, भोलेश वैराट, गणेश पोलकम, किरण बिरांजे, बबन गवळी, विशाल शेलार यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय यशस्वीपणे पार पाडणारे संस्थापक अध्यक्ष राजेश मारुती रासगे यांचे विशेष योगदान राहिले.