लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने पत्रकार दत्ता सूर्यवंशी सन्मानित.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने पत्रकार दत्ता सूर्यवंशी सन्मानित.
कोल्हापूर : फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अन्याय अत्याचार विरोधात लढा देणारे चळवळीचे लोकप्रिय वृत्तपत्राचे संपादक का. बबन कांबळे साहेब यांच्या लेखणीतून साकार झालेले दै. वृत्तरत्न सम्राट चे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांना 2025 चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार ऐतिहासिक कोल्हापूर नगरी येथील शाहू भवन येथे जेष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी गेली वीस वर्ष आपल्या लेखणी द्वारे समाज जागृती आणि न्याय देण्याच्या कार्याबद्दल ऐतिहासिक कोल्हापूर शाहू भवन येथे हा मिळालेला पुरस्कार मी महत्वाचा मानतो. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आर्मी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार दगडू माने, राजेंद्र घाटगे, सुरेश सासणे, मोहन मालवणकर, ऍड. ममतेश आवळे, बाळासाहेब साळवी,ज्योतीताई झरेकर, स्वातीताई माजगावकर, सुजाता कांबळे, लक्ष्मीकांत कुंबळे,शशिभाऊ पांडुळे, सिद्दिक पठाण इत्यादी उपस्थित होते.
