August 6, 2025

थोपवलेला सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल तर फुले, शाहू आणि आंबेडकर चळवळ गतिमान करणे आवश्यक्य – घटनातज्ञ डॉ सुरेश माने,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

भारतात धर्माच्या नावाखाली जबरदस्तीने सांस्कृतिकवाद थोपवला जात आहे, त्यामुळे देशाचा मूळ हे इतिहास, संस्कृती सुपट होत चालली असून जर हा सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर चळवळ गतिमान करणे आवश्यक्य असल्याचे मत घटना तज्ञ डॉ सुरेश माने यांनी व्यक्त केले, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बहुजन साहित्य कला अकादमीने पुणे मालधक्का चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते, या देशातील सांस्कृतिक जडणघडणीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान असून अण्णाभाऊंचे साहित्यही संघर्षाचे आहे, यातून समाजात जगताना प्रेरणा मिळते, अण्णाभाऊंनी या देशातील व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे केलेले धाडस हे तमाम बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते असे मत प्रा. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले बहुजन साहित्य आणि कला यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन केला जाणार, असेही ते म्हणाले, जी.क येनापुरे. श्रीमंत कोकाटे यांनी अण्णाभाऊ यांच्या कामाचा आढावा घेतला, धम्मकीर्ती महाराज परभणीकर. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी विचार मांडले, या कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर अध्यक्ष अमोल तूजारे,ॲड, अंबादास बनसोडे, अभय शेलार धीरज बगाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button