येरवड्यात सिद्धांत शिंदेचा आगळावेगळा वाढदिवस साजरा – महापुरुषांची प्रतिमा भेट, बालकांना खाऊ वाटप

येरवडा : महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन येरवडा परिसरातील युवक सिद्धांत संतोष शिंदे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला.
यावेळी सिद्धांत यांनी अन्वरभाऊ पठाण, मनोजभाऊ शेट्टी, दुर्गेश भाऊ हतागळे, दत्ता भाऊ सूर्यवंशी यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे** तसेच अन्य महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांचा आदर्श घेऊन सिद्धांत यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
उपक्रमादरम्यान लहान बालगोपाळांना खाऊ वाटण्यात आला व त्यांच्या समोर महापुरुषांचा आदर्श ठेवण्यात आला. यावेळी युवकांना उद्देशून सिद्धांत म्हणाले, “युवक आपल्या आई-वडिलांचे उपकार फेडू शकत नाहीत, परंतु त्यांच्या उतारवयात त्यांना आधार देणे आणि सेवा करणे हीच खरी कर्तव्यपूर्ती आहे.”
