अरेना अनिमेशन एफ.सी.रोड, पुणे चा ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अभिमानाने सहभाग

पुणे :भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राबविण्यात येणारी ‘हर घर तिरंगा’ ही राष्ट्रव्यापी मोहीम नागरिकांना त्यांच्या घरावर, कार्यालयावर किंवा संस्थेवर तिरंगा फडकावून देशाविषयीचा अभिमान आणि ऐक्य दर्शविण्याचे आवाहन करते.
या देशभक्तीपर उपक्रमात अरेना ॲनिमेशन एफ.सी. रोड, पुणे डिझाईन कॅम्पस यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
या प्रसंगी अरेना ॲनिमेशनचे संचालक श्री. निखिल हल्ली यांनी सांगितले की, तिरंगा हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ होते. अरेना एफ.सी. रोड गेली ३० हून अधिक वर्षे ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत असून, एआय, अनिमेशन, व्हीएफएक्स, फिल्म मेकिंग, ग्राफिक डिझाईन, गेमिंग आणि यूआय/यूएक्स या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य आहे.
निखिल हल्ली यांनी लंडन विद्यापीठातून अनिमेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आणि अनिमेशन तसेच मीडिया व एंटरटेनमेंट क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते बीबीसी व एमपीसी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्टुडिओशी संबंधित होते. तसेच, त्यांनी युनायटेड किंगडम, सिंगापूर आणि शांघाय येथील विद्यापीठांमध्ये परदेशी व्याख्याता म्हणून अध्यापन केले असून, गेल्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय व्याख्याता आणि मोटिव्हेशन लीडर म्हणून कार्यरत आहेत.
या उपक्रमाद्वारे संस्थेने प्रत्येक नागरिकाला आवाहन केले की, ‘हर घर तिरंगा’मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि देशासाठी अभिमान व्यक्त करावा.
