October 26, 2025

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा

 

पुणे – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या  पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट  २०२५  रोजी अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माननीय आमदार श्री. अमित गोरखे, संचालक श्री. विलास जेऊरकर, शाळेच्या व्यवस्थापक प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर आणि मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेतील लहानग्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीवर आधारित एक सुंदर नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच विद्यार्थ्यांनी नाचगाणी आणि श्रीकृष्णाच्या नामस्मरणासह दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पाडला.

विद्यार्थ्यांनी नाचगाणी, भजन आणि श्रीकृष्णाच्या नामस्मरणात दहीहंडी साजरी करताच संपूर्ण शाळेचे वातावरण कृष्णमय झाले होते.राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी साऱ्यांचे मन मोहवले आणि क्षणभरासाठी जणू गोकुळच शाळेत अवतरले!असे वाटत होते.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढवणे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे हा होता. विद्यालय प्रत्येक वेळी असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवते. वंदे मातरम द्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी माननीय मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांचे अंतःकरण भारावून गेले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button