October 24, 2025

स्वच्छ सर्वेक्षण २०२५ -२६ मध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी महानगरपालिकेसोबत लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था अशा सर्वांचे एकत्रितपणे प्रयत्न आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पुर्वतयारीचा झाला प्रारंभ..

पिंपरी२३ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी तसेच कामगारांचीकष्टकऱ्यांची नगरी म्हणून देखील आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छहरित आणि समृद्ध शहर आपल्याला बनवायचे आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये या शहराला अव्वल स्थान मिळवण्यासाठी महापालिकेसोबत लोकप्रतिनिधीनागरिकस्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले,यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

                भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात सातवे तर राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे. याशिवाय शहराला ७ स्टार कचरामुक्त शहर व वॉटर-प्लस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या यशामध्ये सहभाग घेऊन योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पुर्वतयारीचा प्रारंभ आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेखासदार श्रीरंग आप्पा बारणेआमदार उमा खापरेअमित गोरखेमहाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडेपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेमुख्य अभियंता संजय कुलकर्णीसह शहर अभियंता बापू गायकवाडउपायुक्त सचिन पवारअण्णा बोदडेमुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडेमुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवालविशेष अधिकारी किरण गायकवाडजनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकमाजी महापौर योगेश बहलमाजी उपमहापौर राजू मिसाळमाजी नगरसदस्य नाना काटेप्रशांत शितोळेनारायण बहिवरेपंकज भालेकरशाम लांडेउत्तम शेट्टीस्वाती उर्फ माई काटेमाजी नगरसदस्यनगरसदस्याविविध सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारीकर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आर.आर.आर. सेंटर डॅशबोर्ड प्रणालीशून्य कचरा प्रकल्प डॅशबोर्ड प्रणालीस्वच्छ शौचालय ॲपस्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ मॅस्कॉट व घोषवाक्याचे तसेच हरित सेतू प्रकल्प बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पांबाबत माहिती देणारी तसेच महापालिकेच्या वतीने पर्यावरण विषयक राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेपिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी साथ दिली तर आपले शहराच्या देशात पहिल्या तीन मध्ये नक्कीच क्रमांक मिळेल. या पद्धतीने नियोजन करून त्यादृष्टिने आजपासूनच कामाला सुरुवात करूया. शहरातील लोकसंख्या वाढत असतानानागरिकरण वेगाने होत असताना आपण शहराच्या स्वच्छतेला देखील महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतःपासून करणे गरजेचे आहे. महापालिका शहर स्वच्छ रहावेयासाठी प्रयत्न करीत असतेच. परंतु त्याला शहरातील नागरिकलोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था अशा सर्वांचीच साथ गरजेची असतेअसेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहरात दररोज १ हजार ४०० टन कचरा निर्माण होतो. लोकांचे राहणीमान बदलत असताना कचऱ्याचे प्रमाण वाढत आहेयाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणालेदेशात स्वच्छता सर्वेक्षणात इंदोर शहर प्रथम येतेयामध्ये तेथील नागरिकांचा वाटा महत्त्वाचा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील त्यादृष्टिने महापालिकेस सहकार्य़ करावे. अनेकदा आपण जेव्हा परदेशात जातोतेव्हा तेथील नियम पाळतो. कचरा रस्त्यावरउघड्यावर टाकत नाही. कारण दंड होईल अशी भिती असते. परंतु भारतामध्ये हे नियम पाळत नाही. भारत ही आपली मातृभूमी आहे. येथेच आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे. अशा वेळी आपल्या शहरात देखील स्वच्छता राहीलयाकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

 

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणालेपिंपरी चिंचवड शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यास चांगले प्राधान्य दिले आहे. नागरिकांना चांगल्या सेवा मिळाव्यातयासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रयत्न करीत असते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शहरात आगामी काळात पवनाइंद्रायणीमुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. परंतु हे करीत असताना नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावेअसेही खासदार बारणे यांनी सांगितले

महापालिका आयुक्त शेखर सिंह स्वागतपर प्रास्ताविक करताना म्हणाले कीस्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला मिळालेल्या यशाचे खरे शिल्पकार आपले स्वच्छता सेवक व शहरातील नागरिक आहेत. आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक मिळवण्याचे ध्येय साध्य करायचे आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५  मध्ये मिळालेल्या यशामुळे आपल्याला त्यासाठी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहेअसेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्वाती महांळकर यांनी केले. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आभार मानले.

जर्मनीला निघालेल्या श्रावणी टोनगे हिचा सत्कार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये योगदान देणाऱ्यांचा सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या यशस्वी कामगिरीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकलोकप्रतिनिधीसेवाभावी संस्थामहापालिका अधिकारी-कर्मचारी आदींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या सहभागाबद्दल प्रतिनिधिक स्वरूपात त्यांचा सन्मान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

यामध्ये सफाई सेविका अनुसया वाकचौरेवैशाली मारणेसफाई सेवक शिवानंद मोचीलक्ष्मण पांचाळगंगा वाघमारेमंगेश रघुरावदीपक शिंदेसीताराम दातेकचरा संकलन वाहक चालक राजू देवकरनिलेश कांबळेआयईसी सदस्य अनिकेत पवारशुभांगी राठोडयोगीता ढाकरेसुखदेव लोखंडेअनिलकुमार पाटीलसुरेखा इंगळेरोहन वडमारेकुशल मोरेस्वच्छता दूत पूजा शेलारसुरेखा डोळससंगीता जोशीअदिती निकमयशवंत कन्हेरेआर.जे. बंड्याईशिता बारवाडनवी दिशा महिला बहुउद्देशीय मंडळवैष्णवी बचत गटमहापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गेअश्विनी गायकवाडअजिंक्य येळेअमित पंडिततानाजी नरळेअतुल पाटीलकिशोर ननवरेपूजा दुधनाळेसहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळेअंकुश झिटेसुधीर वाघमारेकिशोर दरवडेशांताराम मानेमहेश आढावराजेश भाटश्रीराम गायकवाड आदींचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

  याशिवाय महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णीकार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सलसत्वशील शितोळेअनिल भालसाखळेजलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळराजेंद्र जावळेप्रेरणा सिनकरजाहिरा मोमिनचीफ केमिस्ट उमा भोगेउपअभियंता योगेश आल्हाटविविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शरद टंडनचैतन्य बेर्डेजोसे जेकबसंजू जेकबशिजू अँटोनीमहेंद्र अनंथुलाब्रिजेश कुमारअनिकेत जाधवरोहित आपटेप्रकाश संचानिया आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला.

…..

स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

 

पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ च्या अनुषंगाने स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. घोषवाक्य स्पर्धेमध्ये ३४२ प्रवेशिका आल्या होत्या. या स्पर्धेत गिरीश कुटे यांनी पारितोषिक पटकावले आहे. तर मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये अतुल वाघमैतर यांच्या मॅस्कॉट डिझाईनला पारितोषिक मिळाले आहे. या दोघांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.

…..

हरित सेतू’ प्रकल्प ब्रँड डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

 

पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ब्रँड डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३ लाख रुपये हे प्रज्ज्वल जयसिंग दिंडे यांनीद्वितीय क्रमांकाचे पारितोषिक २ लाख रुपये रोहित राजेंद्र घोडके यांनी आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येकी ५० हजार रुपये अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज यांनी मिळवले आहे. तसेच विशेष ज्युरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले आहे. या सर्व विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकाची रक्कमसन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाडस्पर्धेचे ज्युरी हेड आश्विनी देशपांडेआयटीडीपीच्या काश्मिरा मेढोरापीडीएचे प्रसन्ना देसाईअसोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे रंजना दाणीपौर्णिमा भुरटेचंद्रशेखर बडवेऋग्वेद देशपांडे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button