जेजुरीत शनी अमावस्येनिमित्त महाप्रसादाचे आयोजन*

जेजुरी (प्रतिनिधी) :
“जय शिव मल्हार” घोषणांनी दुमदुमलेल्या कडेपठार पायथ्याशी शनी अमावस्येनिमित्त शिव मल्हार फिटनेस ट्रस्ट महाप्रसाद सेवा तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रद्धाळूंसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने ही सेवा पार पडली.
या महाप्रसाद सेवेच्या आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अशोक दादा उमापे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कबीरभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेल्या सर्व भक्तांना स्वयंसेवकांच्या मदतीने उत्तम व्यवस्थेत जेवण देण्यात आले.
शनी अमावस्येनिमित्त दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमामुळे समाजात भक्तीभावासोबतच एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. स्थानिक नागरिक, भाविक व मंडळींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाप्रसाद सेवा यशस्वी झाली.
