सामाजिक–शैक्षणिक कार्याचा गौरव सागर वाल्मीक त्रिभुवन यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
पुणे प्रतिनिधी:यशवंत शिंदे,
सामाजिक–शैक्षणिक कार्याचा गौरव सागर वाल्मीक त्रिभुवन यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित,सामाजिक परिवर्तन, युवकांना दिशा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडवणारे सागर वाल्मीक त्रिभुवन यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक परिवर्तन, युवकांना दिशा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडवणारे सागर वाल्मीक त्रिभुवन यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा भव्य सोहळा पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ येथे ‘साऊ-ज्योती सामाजिक फाउंडेशन’च्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे, अभिनेत्री भक्ती साधू आणि अभिनेत्री चित्रा दिक्षीत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्रिभुवन यांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गार काढताना सांगितले की – “सामाजिक कार्यकर्त्यांचा योग्य तो गौरव होणे ही काळाची गरज आहे. सागर त्रिभुवन यांचे कार्य युवकांसाठी आदर्शवत आहे.”
अनेक वर्षांपासून वंचित घटकांचे सक्षमीकरण, शिक्षणाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम, तसेच सामाजिक जागृतीसाठी त्यांनी घेतलेली धडपड आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


हा सन्मान केवळ सागर त्रिभुवन यांचा नसून संपूर्ण समाजाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.”
“अशा कार्यकर्त्यांच्या कार्यामुळेच समाज पुढे जातो आणि प्रेरणेचा मार्ग तयार होतो.
पुणेकर माझा कडून सागर त्रिभुवन यांचे मनःपूर्वक अभिनंदन!”
