वेलंकण्णी मातेच्या ५३ व्या वर्ष सोहळ्यात खडकीत ३८ वर्षांची अखंड अन्नसेवेची परंपरा जपली!
खडकी –सेंट इग्नाशियस चर्च, खडकी येथे वेलंकण्णी मातेच्या आरोग्याच्या ५३ व्या वर्षाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते भाविकांसाठी गेली तब्बल ३८ वर्षे सुरू असलेली अखंड अन्नसेवा.







ही सेवा सातत्याने डी.ओ.डी. फुटबॉल संघ आणि ऑर्डनन्स डिपो, तळेगाव दाभाडेचे माजी कर्मचारी यांच्यावतीने आयोजित केली जाते. यावर्षीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नल शशांक सिंग (कमांडंट, ओ.डी., तळेगाव), श्रीमती इंदु शशांक सिंग, तसेच मेजर शैरी अश्रफ (प्रशासक, ओ.डी., तळेगाव) हे उपस्थित होते.
आदरणीय धर्मगुरू रेव्हरेंट फादर व्ही. लुईस आणि रेव्हरेंट फादर डेनिस यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. आयोजन समितीचे नेतृत्व शोभाराम परदेशी, सिरिल असीवादन, सोना सिंग, अनिल जाधव, देवराज स्वामी, अविनाश भांडारे, दीपक शिवटे, दोरेराज मुत्थू, ए.आर. शेख, श्रीमती बी. रिबेलो, आय.सी. संकथ, श्रीमती जे. पिल्लई, एम. पॅट्रिक, पुष्पराज, नीलू पिल्लई, कृष्णा पी., मेलरॉय एफ., श्रीमती जितेशना सोलंकी, बी.के. विश्वास, शैलेश कांबळे आणि इतर सदस्यांनी केले.
सेंट डोमिनिक सेविओ युवा आणि सॅक्रेड हार्ट चर्चच्या स्वयंसेवकांनीही अन्नसेवेत सहभाग घेऊन यात्रेकरूंना भोजन वाटप केले.
श्रद्धा, सेवा आणि ऐक्याचा संगम असलेला हा सोहळा भाविकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.
