October 26, 2025

सुंधामाता [चामुण्डामाता), लक्ष्मीमाता, अंबामाता मंदिरामध्ये महानवरात्रौत्सव निमित्त विविध कार्यक्रम

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुणेः कात्रज येथिल सुंधामातानगर येथे सुंधामाता [चामुण्डामाता), अंबामाता, लक्ष्मीमाता तसेच गणेश आणि सोनाणा खेतलाजी यांच्या मंदिरामध्ये नवरात्रौत्सव २२ सप्टेंबर पासुन मोठ्या जोश व जल्लोषामध्ये तसेच देवी च्या नाम घोषाने सुरु होत आहे.
या मंदिराचे विशेषण म्हणजे हे एक सुर्यमुखी मंदिर आहे. दररोज सुर्याची पहिले किरण मंदिरावर व मातेच्या मुखावर पडते. मंदिराचे वरच्या घुमटावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिरावर कळसाच्या बाजुला ६० फुटाचा भगवा झेंडा आलेल्या भक्तांचे विशेष लक्ष वेधुन घेतो, मध्यभागी सिंहाची मुर्ती आहे. तसेच उजव्या बाजुला सोणाना खेतलाजी तर डावीकडे गणेशाची मुर्ती स्थापित केली आहे. गाभा-यामध्ये उजवीकडे लक्ष्मीमाता डावीकडे अंबामाता व मध्यभागी सुंधामाता । चामुण्डामाता यांच्या सुंदर व सुरेख अशा संगमरवरी मुर्ती स्थापित केल्या आहेत. या मंदिराचे तसेच मंदिरातील देवंतांच्या मुखावरील तेज व आजुबाजुच्या परिसरातील चैतन्य दिवसेंदिवस द्वीगुणीत होत चालले आहे. मातेच्या मुर्तीवर अतिशय नक्षीदार असे खडयांचे झुंबर लावलेले आहे.
नवरात्रीमध्ये रोज सकाळी ८:१५ वाजता तर सायंकाळी ७:१५ वाजता महाआरती मंदिरात केली जाते. मातेच्या दर्शनाला व आरतीला आजुबाजुच्या रहिवासीबरोबरच शहरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. सर्वाच्या आरतीच्या जयघोषाने आजुबाजुचा परिसर अगदी भक्तिरसात तन्मय होऊन जातो. रोज सकाळी व संध्याकाही मंदिरातध्ये येणा-या भक्तांकरिता उपवासाचे पदार्थ खिचडी, लाडु, फळे इ. प्रसाद वाटण्यात येतो.
या मंदिराचे प्रमुख आधारस्तंभ श्री. प्रमोद माणिकचंद दुगड हे असुन २०२५ चे अध्यक्ष म्हणुन दिपक शेषमल कांगटयनी तसेच सेक्रेटरी म्हणुन सुरेश माळी तसेच ट्रस्टी मध्ये श्री. महेंद्र माणिकचंद सुंदेचा [मुथ्था, श्री. प्रकाश मोहनलाल बोरा [समदडी], अशोकजी [जैन] लुनावत, नेमाई परमार, उमरावजी पुरोहित, गुमानजी मुथ्था व सुरेशजी लुनावत [गडावळा ] यांच्या देखरेखाली मंदिराची सर्व कामे होत आहेत. मंदिराच्या सर्व जबाबदा-या सुंधामाता ट्रस्ट हे अगदी भक्तिपणाने पार पाडत आहेत.
तरीही सर्व माताभक्तांनी सुंधामाता [चामुण्डामाता] दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button