खराडीतील परमार स्क्वेअर सोसायटीला पाण्याचा तुटवडा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – ८ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
खराडी येथील परमार स्क्वेअर हौसिंग सोसायटीला भर पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या निषेधार्थ सोसायटीतील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर (बंडु तात्या) पठारे यांनी सांगितले की, “बंड गार्डन पाणीपुरवठा अधिकारी नितीन जाधव यांना निलंबित करावे व सोसायटीला तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आठ दिवसांच्या आत प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषण केले जाईल.”
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश भाऊ गवई, संतोष वाळुंज, मंगेश पाटील, उल्हास अस्वार, प्रमोद सिंग, सत्यम गांधी, राकेश सुद, सुभाष घाडघे, सामाराम चौधरी, मनीषा पठारे, वाळके मावशी, सौ. माने, ऐश्वर्या गवई, ॲडव्होकेट विशाल केदारी, दादा रणसिंग, डॉ. आम्रपाली मोहिते आदींसह सोसायटीतील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
सोसायटीतील नागरिकांनी मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे.


