October 26, 2025

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या आर्यन कराड यास तलवारबाजीत यश

पुणे : चेअरमन श्री. सागर ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित शालेय जिल्हा स्तर तलवारबाजी स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेमध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी कु. आर्यन कराड यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

आर्यन कराड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व क्रीडा विभाग प्रमुख यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button