बोपोडी परिसरात रेणू हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन













“पुण्यातील बोपोडी परिसरात रेणू हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एकूण १२८ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रेणू हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध सर्जन डॉक्टर विजय ढोबळे यांनी भूषवले. समाजातील गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने मी डॉक्टर झालो, असे उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली – कार्यक्षम नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे, माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, श्रीकांत पाटील,शैलेजाताई खेडेकर,ऍडव्होकेट नंदलाल धीवार,आनंद छाजेड, ऍडव्होकेट रमेश पवळे,राजेंद्र भुतडा,सुंदरताई ओव्हाळ,शशिभाऊ पांडुळे,विजय जाधव,सेल्व्हराज अंथोनी,अशोक गायकवाड ,विनोद सोनवणे,प्रदीप खेडेकर,विलास ढोबळे,दीपक रोकडे,आदी मान्यवरांनी भेट देऊन डॉक्टर ढोबळे यांच्या कार्याचा गौरव केला आणि शुभेच्छा दिल्या.
तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टर – डॉक्टर ज्योती ढोबळे, डॉक्टर पॉन्सेलव्ही बेंजामिन, अपर्णा शेटे,ज्युडी पोवार,अमोल अवघडे,राकेश समल यांनी रुग्णांची तपासणी केली. फायब्रो स्कॅन, रक्तातील साखर, रक्तदाब अशा विविध तपासण्या करून रुग्णांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या सर्व मान्यवरांचा सन्मान रेणू हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले.”
“नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रेणू हॉस्पिटलचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरत असून पुढील काळात अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”
