राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
मराठावाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावातील आपत्तीग्रस्त अनेक कुटुंबांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्य राशनकिट वाटप करण्यात आले,
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे, कार्याध्यक्ष संजय शिंदे, हरीश भामरे, अजय ढवारे, नवनाथ सावंत, शिवानंद कांबळे, मधुकर चाबुकस्वार, भारत चाबुकस्वार, मनोज चाबुकस्वार, नागनाथ चाबुकस्वार, तात्याबा चाबुकस्वार, कारण चाबुकस्वार, लक्ष्मण चाबुकस्वार, विनायक चाबुकस्वार, नागनाथ बनसोडे, अजय शिंदे, राजू शिंदे, रवी शिंदे, पंडित शिंदे, अंबादास शिंदे, राजू हांडे, देवाप्पा शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते,


