October 26, 2025

कर्वेनगरमधील धनुर्विद्या संकुलाचे 16 ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

पुणे/ कोथरूड : कर्वेनगर प्रभागात सुरू होत असलेला पुणे महापालिकेच्या पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलचा भूमिपूजन सोहळा येत्या 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बद्दल अधिक माहिती देताना स्वप्निल दुधाने यांनी सांगितले की, कर्वेनगरमधील धनुर्विद्या संकुल म्हणजे केवळ एक इमारत किंवा मैदान नव्हे, तर अनेक नवोदित खेळाडूंचे स्वप्न साकार होण्याची आशा आहे. स्थानिक माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने व स्वप्निल दुधाने यांचा अथक प्रयत्न आणि प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या धनुर्विद्या संकुल चा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता, 100 फुटी डीपी रोड, सर्वे नंबर 9, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button