नवरात्रीच्या उत्साहात बोपोडी परिसरात रंगला महिलांसाठी खास असा होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा
बोपोडी प्रतिनिधी:
जनसेवा सोशल फाउंडेशन, औंध-बोपोडी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महिला वर्गाकडून मिळाला प्रचंड प्रतिसाद.कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेवक आणि भाजप उत्तर शिवाजीनगर मंडळ अध्यक्ष आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी लायन्स क्लब अध्यक्षा सपना भाभी छाजेड,माजी उपमहापौर सुनीता ताई वाडेकर, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, कैलास दादा गायकवाड, तसेच विविध पक्षांचे मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला, तर विजेत्यांना आकर्षक पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सोशल फाउंडेशन औंध-बोपोडी यांच्या वतीने करण्यात आलं होतं. संस्थेचे मार्गदर्शक देविदास रेड्डी, अध्यक्ष मयुरेश गायकवाड आणि महिला अध्यक्षा पल्लवी म्हस्के यांनी मान्यवरांचा सत्कार करून सर्व सहभागी महिलांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांनी केले.
नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाने बोपोडी परिसरात उत्साह आणि ऐक्याचा नवा रंग भरला!
