August 6, 2025

शिल्पा शेट्टी: इंटरनेटने ज्यांना बनवले स्टार, आता सुपर डान्सरचा मंच बनवेल त्यांना सुपरस्टार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर आता दणक्यात पुनरागमन होत आहे.
हे सत्र विशेष असणार आहे कारण त्यातील 12 स्पर्धक केवळ असामान्य डान्सर नाहीत तर सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड संख्येत फॉलोअर्स आहेत. आपल्या व्हायरल डान्स मूव्ह्ज द्वारे इंटरनेटवर धमाल उडवून देणारे हे छोटे उस्ताद आता एका नवीन आव्हानाला तोंड देणार आहेत. आपल्या प्रतिभेच्या बळावर मंचावर लाईव्ह परफॉर्म करून परीक्षक आणि प्रेक्षक यांचे मन जिंकून घेण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.
शिल्पा शेट्टी म्हणते, “या प्रत्येकाची शैली अनोखी आहे. ते सगळे अष्टपैलू आहेत. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचा पाठिंबा त्यांना आहे. ‘इंटरनेटने ज्यांना बनवले स्टार, आता सुपर डान्सरचा मंच बनवेल त्यांना सुपरस्टार’ या उद्गारांमध्ये या सीझनचे सार योग्य रीतीने व्यक्त झाले आहे. अनेक लोकांप्रमाणे मी देखील इंटरनेटवर त्यांचे परफॉर्मन्सचे पाहिले आहेत, त्याचा आनंद घेतला आहे. पण सुपर डान्सरच्या भव्य मंचावर त्यांना एकमेकांशी स्पर्धा करताना बघणे आणि त्यांच्यातून एकाला सुपरस्टार होताना बघणे फारच रोमांचक असेल. मला खात्री आहे, प्रेक्षकांसाठी ही एक डान्सची पर्वणी असणार आहे. नवा सीझन त्यांना नक्कीच आवडेल!”
यंदाच्या सत्राचे परीक्षक आहेत शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि मर्झी पेस्तनजी. हा सीझन दमदार परफॉर्मन्स, आगळ्या-वेगळ्या डान्स शैली आणि अदम्य उत्साह आणि ऊर्जा यांची हमी देतो.

बघा, सुपर डान्सर चॅप्टर 5, 19 जुलैपासून दर शनिवार-रविवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button