शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल – खडकी शिक्षण संस्थेत बस लोकार्पण, संगणक प्रयोगशाळा उद्घाटन आणि साहित्य वाटप



महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये बस लोकार्पण, संगणक प्रयोगशाळा उद्घाटन, तसेच शालेय साहित्य वाटप सोहळा संपन्न झाला.
या उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र आळंदीहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी, लोकसहभागातून खडकी शिक्षण संस्थेला एक खास बस प्रदान करण्यात आली असून त्याचे लोकार्पण आज करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांसाठी नवी संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली तसेच शालेय बॅग व गणवेशांचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल,राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक राजेश पांडे,संस्थेचे सचिव आनंदजी छाजेड,सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे,अन्य मान्यवर – क्षितिज कुलकर्णी, रोहिणी चौधरी, पूनम किचाडी,राजेंद्र भुतडा, रमेश अवस्थे, मनीषा कांबळे आदींची उपस्थिती लाभली.