August 7, 2025

कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!

कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!

हरकानगर, काशेवाडी – कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महालक्ष्मी देवीचा उत्सव अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. स्थानिक महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, कीर्तन, देवीची महापूजा यांसारख्या भक्तिमय कार्यक्रमांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली ती म्हणजे ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली महालक्ष्मी देवीची भव्य मिरवणूक, ज्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवीच्या पालखीची मिरवणूक रंगतदार देखाव्यांसह पार पडली. मिरवणुकीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विक्रम पवळे, आदित्य पवळे, पृथ्वीराज ऊल्लारे, गोविंद ससाणे, गौरव चांदणे, यश उकरंडे, सुरज शेंडगे, सुमित भोसले, प्रज्वल साळवे, प्रज्वल सपकाळ, आदित्य ओवाळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्या पुढाकारामुळे उत्सव अधिक भव्य व यशस्वी झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button