राष्ट्रीय पांचभौतिक चिकित्सा परिषद संपन्न

राष्ट्रीय पांचभौतिक चिकित्सा परिषद संपन्न
वैद्यराज दातार पांचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्र सांगली, आयडीआरए ,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट वाघोली व सेंटर ऑफ एक्सलन्स, आयुष विभाग ,पुणे विद्यापीठ या चार संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 20 जुलै रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पांचभौतिक चिकित्सा या आयुर्वेदातील विषयावरील दोन दिवसांची राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद दिमाखात संपन्न झाली.
यासाठी भारतभरातून 400 पेक्षा अधिक वैद्य ,विद्यार्थी , पदव्युत्तर विद्यार्थी ,संशोधक यांनी उपस्थिती दाखवली. धूतपापेश्वर, सांडू व इतर अनेक औषधी निर्माण कंपन्यांनी आपली संशोधनाभिमुख उत्पादने येथे सादर केली .
या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.गोसावी ,आयुष विभागाचे डॉ.भूषण पटवर्धन डॉ. कौस्तुभ उपाध्याय. आय टी आर ए च्या डायरेक्टर डॉ. तनुजा नेसरी, एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ राकेश शर्मा बी एस डी टी या संस्थेचे प्रमुख डॉक्टर सदानंद सरदेशमुख तसेच मुख्य कन्व्हेनर वैद्य प्रशांत सुरू, वै.गिरीश टिल्लू ,वै. सुहास जोशी
वै. अशोक वाली, प्रकुलगुरू काळकर सर ,वै. राजेंद्र प्रसाद वै. वारियर हे उपस्थित होते .वैद्य आ.वा. दातारशास्त्री प्रणित पांच भौतिक चिकित्सेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याचप्रमाणे त्यामध्ये वेगवेगळे संशोधन व्हावे आणि त्याचा जनसामान्यांसाठी उपयोग व्हावा असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या पांचभौतिक चिकित्सेच्या अनुषंगाने वैद्यक परिषदा आयोजित केल्या जातील असे संयोजकांकडून सांगण्यात आले. यावेळेस “पांचभौतिक चिकित्सा तत्त्व संग्रह” या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
