रोटरी विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव.

पुणे (दि.२०) रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी स्वाती यादव यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष निलेश धोपाडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी प्रशांत अकलेकर यांची निवड करण्यात आली. पुण्याई सभागृह कोथरूड यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल संतोष मराठे. सहाय्यक प्रांतपाल अॅड.भूषण कुलकर्णी, रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष स्वाती यादव यांनी आगामी वर्षात ग्रीन स्कूल्स आणि ग्रीन एक्स्पो सारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांसह अॅनिमिया थॅलेसेमिया विषयक वैद्यकीय शिबिरे, मिलेट(नाचणी,बाजरी ज्वारी) शेतीस प्रोत्साहन, तसेच बोअरवेल रिचार्ज व पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आदी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
छायाचित्र : स्वाती यादव.
