इनरव्हील डिस्ट्रीक्ट ३१३ च्या प्रांतपालपदी डॉ.आशा देशपांडे.

पुणे (दि.२०) सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील डिस्ट्रीक्ट ३१३ च्या प्रांतपालपदी डॉ आशा देशपांडे यांची निवड करण्यात आली. मावळत्या प्रांतपाल डॉ.शोभना पालेकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या माजी पास्ट इंटरनॅशनल इनरव्हील रिप्रेझेंटिव्ह चारू चिंचणकर, या समारंभाच्या कन्व्हेनर माजी प्रांतपाल सुनंदा हुल्याळकर, को कन्व्हेनर माजी अध्यक्ष शृणाली आपटे, संयोजक इनरव्हील पुणे अध्यक्ष माधवी पुरोहित,सचिव सुजाता जयवंत,ज्येष्ठ उद्योजक फतेचंद रांका आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील सुमारे ६०० समाजसेवी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित प्रांतपाल डॉ.आशा देशपांडे यांनी इनरव्हीलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील गरजूंसाठी प्रकल्प राबवावेत असे सांगितले. ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांमध्ये जनजागृती,निदान व आवश्यकता असल्यास वैद्यकीय सहाय्य यात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
