अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेज साठी कायदेशीर कारवाई होणार का ? अरविंद शिंदे



बोपोडी (पुणे), : :प्रभाग क्र. 8 अंतर्गत चिखलवाडी येथील 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली अनेक चार महिने तहानले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता क्रेडिट घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ आज काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आला. या सरचिटणीस शरद रणपिसे, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, सेल्वराज अँथोनी, नंदलाल धिवार, ज्योती परदेशी सह 100 ते 150 महिला सहभागी झाले होते. औंध रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकी पर्यंत कॉग्रेसच वतीने मोर्चाकाडून घोषणाबाजी करित जल जन आंदोलन करून नारिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी मनपा तर्फे कुठला ही प्रस्ताव नाही, तर दुसरी कडे प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांनी घेतलेला हा अशासकीय आहे मग मनपा च्या जागेत अनाधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे. आयुक्त अशा अनाधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल उदघाटन प्रसंगी अरविंद शिंदे यांनी थेट पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे.
.जेव्हा महापालिकेच्या म्हणण्यानुसार टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का?अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार? असा आरोप ही विनोद रणपिसे यांनी केला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्टपाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने आज रोजी वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तहन, राजकीय ‘मार्केटिंग’पाण्याचा प्रश्न जिथे लोकांच्या जगण्याशी निगडीत आहे, तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनाचा घाट घालत आहेत.नगरसेवक नाहीत, तरीही उद्घाटनात झेंडे आणि चेहरे!प्रशासन म्हणते टाकी अपूर्ण, पण काहीजण म्हणतात उद्घाटन करायचं!हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत, पण मालक असल्यासारखे वागतात!
शेवटी, विनोद रनपिसे यांचे स्पष्ट मतजर आहेकी ,खरोखर उद्घाटन अधिकृत असेल, तर महापालिका आयुक्तांनी त्या ठरावाची प्रत दाखवावी – मी स्वतः उद्घाटनात सहभागी होईन! पण जर केवळ श्रेयासाठी नागरिकांच्या भावनांशी खेळू नये.