मिलिंद नगर, सेक्टर २२, निगडी येथे मरीआई माता मंदिर भूमिपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला
आठ ऑगस्ट रोजी झालेल्या या भूमिपूजनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक शामभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सुलबाताई रामभाऊ उबाळे, संगीता ताई शामभाऊ पवार, अजिंक्य भाऊ उबाळे, तानाजी भाऊ शिंदे, सनी भाऊ मोरे, सूरजभाऊ पडगळ यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
मरीआई माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मंदिरातून महिलांसाठी विविध योजना, स्वसंरक्षण प्रशिक्षण, संविधान जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, तसेच मुलांसाठी संस्कार वर्ग अशा लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची माहिती उद्घाटन प्रसंगी देण्यात आली.
भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती यांचा संगम साधणारा हा उपक्रम, परिसरातील विकास व एकतेचा नवा अध्याय ठरणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये राजू तांबोळी, लहू नाटेकर, सिद्दप्पा ओसमणी, अभी शिंगे, आकाश नाटेकर, गणेश उदयकर, उमेश धरेगोळ, रोहित सलादळी, संतोष गायकवाड, राकेश आनंद, श्रीकांत कांबळे, अजय नाटेकर, रवी नाटेकर, विकास बोगडे, अनिकेत कुलाली, सुनील कुलाली, ऋषिकेश वाघमारे, आकाश जोगदंड, फारूक फुलारी, लक्ष्मण गायकवाड, रितेश ओसमणी, शुभम उदागे, रोहन गायकवाड, अर्जुन निंबाळकर, शिवशरण हिरपीकर, रमेश गायकवाड, सन्मुख हदीमणी, सुमित देवकर, अमर पवार, आकाश शिंदे यांचा समावेश होता.


