डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन



डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन
पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, सरकारकडून स्थगिती आदेशाचे स्वागत
आजच्या स्वातंत्र्यदिनी, पुण्यात एक महत्त्वाचा जनआंदोलनाचा स्वर उमटला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन छेडले…
पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सरकारकडून आलेल्या स्थगिती आदेशाचे स्वागत करण्यात आले आहे.”
“मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर हे आंदोलन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
हजारो भीमसैनिकांनी स्मारकाची मागणी करत शांततेत ठिय्या धरला.
विशेष म्हणजे, घोषणाबाजी नाही, भाषणे नाहीत… पण,
‘आजवर पुण्यात बाबासाहेबांचे योग्य राष्ट्रीय स्मारक झाले नाही’
ही खंत आंदोलनात स्पष्ट जाणवत होती.”
“या आंदोलनाला विविध पक्ष, सामाजिक संघटना, मातंग समाज, मुस्लिम समाज, तसेच इतर समाजघटकांनीही पाठिंबा दिला.
महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.”
“दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि
नियोजित जागेवरील खाजगी विकासकामाला स्थगिती मिळवण्यात यश आले.
त्याबद्दल त्यांचे आभार मानले गेले.
मोहोळ यांनी कृती समितीशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांगितले की,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत… आणि स्मारकासाठी समाजाला पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही.“
“राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि
सरकार तुमच्या भूमिकेसोबत आहे असा विश्वास दिला.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्मारकासाठी सकारात्मकता व्यक्त केली आहे.”
“आता आंदोलकांची ठाम मागणी आहे की,
शासनाने स्मारकासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा
आणि किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी.
आंदोलनानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये अशी भावना आहे की,
स्मारकाचा मार्ग आता अधिक प्रशस्त झाला आहे.“
“म्हणजेच, पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे
आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
