October 26, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ७७ तक्रार वजा सूचना प्राप्त…

पिंपरी२५ऑगस्ट २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७७ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

       आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार  पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या सोमवारी अग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

          आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ३१२१२१२ १३ २ आणि १७ अशा एकूण ७७ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी शहरातील शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधावेतवाहतुकीच्या समस्यामहिलांच्या शौचालयांची दुरावस्थागणपती मंडळ परवानगी साठी लागणारा विलंबगणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजनशहरातील खड्ड्यांची डागडुजी करणेभाजीपाला मार्केटसाठी प्रशस्त जागागणपती काळात मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणे आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button