पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक श्री चक्रधरस्वामी यांच्या जयंती निमित्त अभिवादन…
पिंपरी, दि.२५ ऑगस्ट २०२५ – थोर समाजसुधारक श्री चक्रधरस्वामी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उप आयुक्त सीताराम बहुरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री चक्रधरस्वामींनी आपल्या संत जीवनातून साधेपणा, अध्यात्म, भक्ती, समाजातील समता व मानवतेचा संदेश दिला. त्यांनी प्रतिपादन केलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात.

