October 24, 2025

रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपुल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला, या उपक्रमामध्ये सकाळी वाडिया कॉलेज पुणे येथील महामाता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, तसेच
मांजरी घुले वस्ती येथे रिपब्लिकन कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन, हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन कामगार सेनेमध्ये प्रवेश करण्यात आले, ससून रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपण, अनाथ मुलांना आर्थिक मदत कपडे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर शहरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती राहून केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे,
प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी सेना विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहराध्यक्ष मिलिंद दादा सरवदे, रिपब्लिकन सेना युवक आघाडी शहराध्यक्ष अजय भालशंकर, रिपब्लिकन सेना महिला आघाडी पुणे शहराध्यक्ष स्नेहाताई गायकवाड, बाळासाहेब हजारे पुणे शहर उपाध्यक्ष, संतोष साखरे, पप्पू खलसे, बाबुभाई पठाण, अरबाज पठाण, दत्ता शेंडगे, सोमनाथ लोंढे अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन सेना युवक आघाडी, आदि यावेळी उपस्थित होते,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button