समाजसेवक शरद देशमुख यांना मानाचा सन्मान!





पुण्यात साजरा झाला राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा 2025
साऊ ज्योती सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा 2025 पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते बाळराजे वाळुंजकर,प्राध्यापक धाराशिव शिराळे, पोलीस सब-इन्स्पेक्टर विष्णू देशमुख, सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दिक्षीत, उच्च न्यायालय नागपूरच्या ऍडव्होकेट निता शेळके, प्रबोधनकार आम्रपाली पारवे आणि सचिन देवरे, अभिनेत्री केतकी गावडे, सुवर्णपदक विजेते हिमांशू जैन, लावणी सम्राज्ञी,डॉक्टर विद्याश्री यमचे, संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे,अभिनेत्री भक्ती साधू, लावण्यवती पूजा माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात समाजसेवक शरद देशमुख यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गरजूंसाठी हॉस्पिटलसाठी मदत करणे, अपंग रुग्णांना आधार देणे, शिक्षणाला कुटुंबात सर्वोच्च स्थान देणे आणि मुलगा आशुतोष शरद देशमुखला परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे… अशा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानाच्या वेळी पोलीस सब-इन्स्पेक्टर विष्णू देशमुख, अभिनेत्री भक्ती साधू, संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे आणि अभिनेत्री चित्रा दिक्षीत यांनी त्यांना पुरस्कार हसतमुखाने प्रदान केला.
सन्मान स्वीकारताना शरद देशमुख यांनी आयोजकांचे आभार मानले. हा पुरस्कार त्यांनी आपल्या आई-वडील, कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना अर्पण केला. तसेच पुढेही तळागाळातील लोकांसाठी जोमाने कार्य करत राहण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
“सामाजिक कार्य हीच खरी ईश्वर सेवा…” असे सांगत देशमुख यांच्या शब्दांनी उपस्थितांच्या मनात नव्या उमेदीची प्रेरणा दिली.
