पिंपळे निलखमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; गणेश मित्र मंडळाचे ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ आकर्षणाचे केंद्र*
पिंपळे निलख : गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून परिसरातील विघ्नहर्ता श्री गणेश मित्र मंडळ, गणेश नगर येथे बाप्पांचे आगमन दणदणीत व दिव्य सोहळ्यात झाले.
या सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश भाऊ बालवडकर, अध्यक्ष सागर भाऊ साठे पाटील, उपाध्यक्ष महेश भाऊ सूर्यवंशी, उत्सव समिती अध्यक्ष स्वप्नील भाऊ सोनवणे तसेच उपाध्यक्ष देविदास भाऊ भोर यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गणेशा ढोल ताशा पथकाच्या दमदार वादनात भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.
यंदा मंडळाने ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ हा अनोखा देखावा साकारला असून तो भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. कलात्मकतेने आणि भक्तिपूर्वक साकारलेल्या या संकल्पनेचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक आहेत.
लक्षवेधी बाब म्हणजे, मंडळाच्या स्थापनेला यंदा ४१ वर्षे पूर्ण होत असून चार दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून योगदान देणारे हे मंडळ आजही भक्तांसाठी विश्वासाचे व आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
स्थानिक नागरिक, महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही बाप्पाच्या मिरवणुकीपासून देखाव्यापर्यंत सर्वच उपक्रमांची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.
—


