October 26, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑगस्ट २०२५ अखेर अधिकारी, कर्मचारी असे एकूण ३२ जण सेवानिवृत्त…

पिंपरीदि. २९  ऑगस्ट :-  महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे अधिकारीकर्मचारी यांनी सातत्य,सचोटी व जबाबदारीने केलेल्या सेवेमुळे महानगरपालिका वेगाने मार्गक्रमण करीत असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे माहे ऑगस्ट २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ९ अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांचा उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलात्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगतापसंगणक अधिकारी वैभवी गोडसेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका महासंघाचे नंदकुमार इंदलकरमाया वाकडे तसेच विविध विभागातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे जुलै २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,  कार्यकारी अभियंता विजय वाईकरउप अभियंता मोहन खोंद्रे कार्यालय अधीक्षक साधना ढमालेपांडुरंग मोरे गट निर्देशक मनोज ढेरंगेसिस्टर इनचार्ज शारदा भोरसंगीता कदमलघुलेखक प्रशांत काळेगोरेभांडारपाल अनय म्हसेक्रीडा शिक्षक विजय लोंढेए. एन.एम. वंदना गोपकरसुरक्षा सुपरवायझर शंकर आरोळकरलिपिक शंकर कानडीवायरमन संजय पांढरकररखवालदार मधुकर भारतीशिपाई सुनिता फालेमुकुंद गुरवमजूर गणपती नाईकआया रोहिणी सोन्नयल्लूविशाखा जाधव,  गटर कुली चंद्रकांत जगतापसफाई कामगार आशा जगताप यांचा समावेश होता.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य निरीक्षक संजय गेंगजेसफाई कामगार गेनबहादूर खत्रीमैनाबाई सोनवणेसोजर शिंदेसफाई सेवक शेषराव वाकोडेअन्वर गागडेकचरा कुली संजू घोलपमुकादम अनिल तापकीरसफाई कामगार पोपट चव्हाण यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button