October 23, 2025

पिंपरी चिंचवड विद्यापीठात अभियांत्रिकी विभागाच्या ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत

पिंपरी, पुणे (दि.२९ऑगस्ट २०२५) शिक्षणामुळे व्यक्तीच्या आयुष्याला आकार प्राप्त होतो. अभियांत्रिकी मधील चार वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग त्यावेळची सामाजिक गरज, सार्वजनिक प्रश्न ते सोडविण्यासाठी आवश्यक संशोधन त्याची उपयुक्तता याची सांगड घालून समाजविकासात सहभाग घेतला पाहिजे. शैक्षणिक काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करा, संवाद साधत रहा, वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी द्या असे मार्गदर्शन मुंबई कस्टम विभागाचे आयुक्त गिरीधर पै यांनी केले.

     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते मावळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्या शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘दीक्षारंभ’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मास्टर कार्ड पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागाच्या संचालिका प्राजक्ता निरगुडकर, पीसीयुचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. रामदास बिरादार, अभियांत्रिकी विभाग अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

    अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. स्वच्छ, सुंदर परिसर तसेच आपुलकीने शिक्षण देणारे तज्ज्ञ प्राध्यापक यामुळे पुढील चार वर्षांत विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती होईल, यामध्ये शंका नाही. शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करून नवीन कौशल्ये आत्मसात करावी. म्हणजे तुम्ही भविष्यातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करून यशस्वी व्हाल असे मास्टर कार्ड पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागाच्या संचालिका प्राजक्ता निरगुडकर यांनी सांगितले.

    डॉ. सुदीप थेपडे, डॉ. रामदास बिरादार यांनीही विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रितू दुधमल आणि शितल विसपूते यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

    पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button