महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ, पुणे शहर यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ, पुणे शहर यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा – २०२५ रविवारी दि. २८ सप्टेंबर रोजी आयोजन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. गणेश सोनुने (उप आयुक्त, पुणे मनपा) यांनी भूषवले. सन्मानचिन्हांचे वितरण मा. प्रशांतजी जगताप (महापौर पुणे मनपा, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर – शरद पवार गट), डॉ. यशराजजी पारखी (लेखक व शिक्षणतज्ञ), डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि.प. पुणे), मा. जी. के. थोरात (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी), तसेच मा. के. एस. ढोमसे (सचिव – महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी) यांच्या शुभहस्ते होणार आहे
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. शिवाजीराव कामथे, मा. नंदकुमार सागर, मा. प्रसाद गायकवाड, मा. सचिन दुर्गाडे, मा. शिवाजी शिंदे, मा. पंकज घोलप, मा. हरिश्चंद्र गायकवाड, मा. सोमनाथ भंडारे व मा. सुजित जगताप यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे मान्यवर उपस्थित असणार,
कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ तसेच टीडीएफच्या पदाधिकारी मंडळींनी केले. या सोहळ्याचे संयोजन संतोष थोरात, बाबुराव दोडके, डॉ. उज्वला हातागळे, संतराम इंदरे, राज मुजावर,संजय ढवळे, सौ. भारती राऊत, अशोक धालगडे, प्रा. शशिकांत शिंदे, प्रा. अरविंद मोडक, डॉ. मंगल शिंदे, बाळासाहेब इमडे,संजय कांबळे, सौ. हर्षा पिसाळ, भगवान पांडेकर व सौ. स्वाती लिम्हण यांनी केले.
हा सन्मान सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, टिंबर मार्केट, भवानी पेठ, पुणे येथे मोठ्या उत्साहात आपल्या उपस्थित पार पडणार आहे गुणवंत शिक्षकांना गौरवून त्यांच्या कार्याची समाजमान्य नोंद घेऊन उपस्थित रहावे अशी आयोजकांची विनंती
