पिंपरी, १५ ऑगस्ट २०२५ : वंदे मातरम, भारत माता की जय... अशा देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेलेला परिसर, हातात तिरंगा, मनात उत्साह, आणि ओठांवर जयघोष — अशा उत्साहाच्या वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड ते लोणावळा या तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश वेगाच्या पंखांवर वाहत नेणारी ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला जणू नवचैतन्य देऊन गेली. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका व होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरी शोरूम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय ते लोणावळा तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीला सुरुवात महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, निलेश भदाणे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अण्णा बोदडे म्हणाले की, "राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन नक्कीच उपयुक्त ठरेल." उपायुक्त सचिन पवार म्हणाले की, ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारे असे उपक्रम स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.' होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरीचे सेल्स हेड विशाल गोसावी आणि क्षेत्रीय व्यवस्थापक वेंकटरमण यांच्यासह शेकडो बाईकस्वार सहभागी झाले होते. देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन ही रॅली जणू अभिमानाचा प्रवास ठरली..
Month: August 2025
पिंपरी, १५ ऑगस्ट २०२५: आकाशामध्ये डौलाने फडकणारा तिरंगा आणि दुसरीकडे 'ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू', 'दिल दिया है, जान...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादपुणे : मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या...
पुणे : खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवाल यांनी शानदार कामगिरी करत २२९.२ गुण घेत सुवर्णपदक...
पुणे :भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राबविण्यात येणारी ‘हर घर तिरंगा’ ही राष्ट्रव्यापी मोहीम नागरिकांना त्यांच्या घरावर, कार्यालयावर...
प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा...
पुणे : मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी...
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार कर्जमाफी, शेतमालाला हमीभावासाठी आंदोलन तीव्र होणार - शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा; शेतकरी हक्क...
पुणे, ता. १२: "जैन धर्मातील प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांवर माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही श्रद्धेची...
येरवडा : महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन येरवडा परिसरातील युवक सिद्धांत संतोष शिंदे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला.यावेळी...
