October 27, 2025

Blog

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस सातवा पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एजीसी...

नालंदा (बिहार) :७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य गुरु राष्ट्रीय हिंदी मासिक स्वास्थ्य पत्रिका, नालंदा बिहार यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा...

पुणे: देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे भारताच्या पॅरा शूटरांनी अभिमानाची...

डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलनपुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, सरकारकडून स्थगिती आदेशाचे स्वागतआजच्या स्वातंत्र्यदिनी, पुण्यात एक महत्त्वाचा जनआंदोलनाचा स्वर उमटला आहे.डॉ....

केंद्रीय सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याचे मंत्रालयाचे केलेले अथक प्रयत्न खरंच कौतुकास्पद...

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानिक वासी व जैन कॉन्फरन्स पंचम झोन युवा शाखेच्या वतीने रक्तदान...

पिंपरी, दि. १५ ऑगस्ट २०२५ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेत  भक्तिमय वातावरणात भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव-चिखली परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व महाविद्यालय परिसरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ-मृदुंगाच्या गजरासह टाळ-चिपळ्यांचा नाद आणि विद्यार्थ्यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या सदस्यांनी, स्थानिक समाजसेवकांनी, वारकरी बांधवांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. वारकरी परंपरेतील पालखी सोहळा जसा श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे, तसाच तो एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करणारा सोहळा ठरला. पालखी सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभाग उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण कुमार मोरे, प्रशासन अधिकारी  संगीता बांगर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठाचे संचालक ह. भ. प. राजू महाराज ढोरे ,डॉ. स्वाती मुळे आणि शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे संपूर्ण मिरवणूक सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.    

  पुणे – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या  पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट  २०२५  रोजी अत्यंत उत्साही वातावरणात...

पिंपरी, १५ ऑगस्ट २०२५ : वंदे मातरम, भारत माता की जय... अशा देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेलेला परिसर, हातात तिरंगा, मनात उत्साह, आणि ओठांवर जयघोष — अशा उत्साहाच्या वातावरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड ते लोणावळा या तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश वेगाच्या पंखांवर वाहत नेणारी ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला जणू नवचैतन्य देऊन गेली. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका व होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरी शोरूम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय ते लोणावळा तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीला सुरुवात महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, निलेश भदाणे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अण्णा बोदडे म्हणाले की, "राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन नक्कीच उपयुक्त ठरेल." उपायुक्त सचिन पवार म्हणाले की, ‘घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारे असे उपक्रम स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.' होंडा बिगविंग पीसीएमसी सेंट्रल पिंपरीचे सेल्स हेड विशाल गोसावी आणि क्षेत्रीय व्यवस्थापक वेंकटरमण यांच्यासह शेकडो बाईकस्वार सहभागी झाले होते. देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन ही रॅली जणू अभिमानाचा प्रवास ठरली..                                                                                                                    

पिंपरी, १५ ऑगस्ट २०२५: आकाशामध्ये डौलाने फडकणारा तिरंगा आणि दुसरीकडे 'ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू', 'दिल दिया है, जान...

Call Now Button